प्रियंका चोप्राच्या चाहत्यांची तिच्या सगळ्या अपडेटकडे नजर असते. कारण अगदी बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये देसी गर्लचे चाहते आहेत. सध्या प्रियंका चोप्रा क्वांटिको ३ च्या शूटिंगसाठी न्यूयॉर्क मध्ये बिझी आहे. पण असं असलं तरीही ती आपल्या चाहत्यांसाठी वेळ काढतेच काढते. कितीही बिझी असली तरी प्रियांका सोशल मीडियावर स्वत:चे डे टू डे लाईफचे फोटो शेअर करत असते. आणि आपल्या चाहत्यांना डे टू डे लाईफचे अपडेट देत असते. इन्स्टाग्राम वर प्रियंका चोप्राने एक ताजा फोटो पोस्ट केला आहे.या फोटोला दिलेले कॅप्शन पाहून सगळेच संभ्रमात पडले आहेत. ‘Mood. Stepping out of the box #NYCLife’ , असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. आता हे कॅप्शन प्रियांकाच्या भविष्यातील नव्या योजनेचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण प्रियंका ही अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील आपलं काम दाखवलं आहे. तसेच तिने मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून व्हेंटिलेटर हा सिनेमा प्रदर्शित केला आहे. आता तिचं नवं काय याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.आता नवा प्रोजेक्ट प्रियंकाचा नवा सिनेमा आहे की काय? आणि सिनेमा असेल तर तो बॉलिवूडमध्ये ही हॉलिवूडमध्ये अशी चर्चा रंगली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews